Saturday 1 April 2017

चीननं हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये - रिजिजू

गुवाहाटी : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा सध्या हिंदुस्थानमधील अरुणाचलच्या यात्रेवर आहेत. दलाई लामांच्या यात्रेवर आक्षेप घेत चीननं हिंदुस्थानला धमकावत दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम होईल असं म्हटलं होतं. चीनच्या या वक्तव्यवर गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चीनला जशास-तसे उत्तर दिलं आहे. ‘चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हिंदुस्थान हस्तक्षेप करत नाही, चीननंही हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये’ अशा कडक शब्दात रिजिजू यांनी चीनला खडसावलं आहे.

चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते ला कंग यांनी दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या यात्रेवर चिंता व्यक्त केली होती.

तसंच दलाई लामांच्या यात्रेमुळे चीनला चिंता वाटत असल्याचंही कंग यांनी म्हटलं होतं. मात्र चीनचा विरोध झुगारत दलाई लामा १३ दिवसांच्या ईशान्य हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चिडलेल्या चीननं हिंदुस्थानला धमकावलं होतं. मात्र गृहराज्यमंत्र्यांनी चीनला हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

सामना

No comments:

Post a Comment