Sunday 12 March 2017

लोकसभेत भगवतगीताबाबत विधेयक सादर

नवी दिल्ली - लोकसभेत शुक्रवारी 103 खासगी विधेयक सादर करण्यात आले. यापैकी एका प्रायव्हेट मेंबर बिलद्वारे देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये नैतिक शिक्षांतर्गत भगवतगीता शिकवण्यात यावी, या विधेयकाचा समावेश आहे. हे विधेयक दक्षिण दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी सादर केले.

याशिवाय भाजपचे खासदार महेश गिरी यांनी मेंटनेंस ऑफ यलीनलिनेस विधेयक सादर केले. या विधेयकात गिरी यांनी उघड्यावर शौचालयास जाणे, थुंकणे यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामुळे आरोग्य आणि स्वच्छता ठेवण्यास मदत होईल, असे नमुद केले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्पेशल कोर्ट्स स्थापन करण्याचा प्रस्ताव एका विधेयकाद्वारे केला आहे.

या विधेयकात खास करून महिलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारबाबत एक विशेष न्यायालय असावे, असा प्रस्ताव दिला आहे.
ज्यामुळे अशा प्रकरणांचा वेळीच निकाल लागून महिलांना न्याय मिळेल. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशातील युवकांचा समग्र विकास करण्यासाठी धोरण निश्‍चित करण्याचे विधेयक सादर केले.

बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रंजीता रंजन यांनी लग्नसोहळ्यात मोठ्या प्रमाणात होणार्‍या खर्चावर निर्बंध लावण्यात यावे, असे विधेयक सादर केले. या विधेयकात त्यांनी हुंडा घेण्यावर बंदी आणि लग्नात एक समान खर्च करण्याची व्यवस्था तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Dailyhunt

No comments:

Post a Comment