Saturday 11 March 2017

५० गावे दत्तक घेणार राष्ट्रपती

चंदीगड - हरियाणामधील 50 गावे दत्तक घेऊन त्यांचा विकास करून ती गावे स्मार्ट व्हिलेज करण्याची इच्छा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केल्याची माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पाच्या शेवटच्या सत्रात खट्टर यांनी सांगितले की, राष्ट्रपतींनी स्मार्ट व्हिलेजअंतर्गत जुलै 2006मध्ये 5 गावे दत्तक घेतली होती. या पाच गावांच्या 5 कि.मी. अंतरात येणार्‍या आणखी 50 गावे ते दत्तक घेणार आहेत.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुडगाव जिल्ह्यातील अलीपुर, दौला, हरचंदपुर, ताजनगर आणि मेवात जिल्ह्यातील रोजकामेव ही गावे दत्तक घेतली होती. मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, या पाच गावात आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण आणि कृषि संदर्भात सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हरियाणासाठी ही गौरवाची बाब असून राष्ट्रपतीद्वारा 11 नोव्हेंबर 2016 रोजी दत्तक घेण्यात आलेल्या 5 गावांचा स्मार्ट विकास होत आहे. याबद्दल राष्ट्रपती मुखर्जी यांचे आभार मानतो.

मागील वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्मार्ट मॉडेल व्हिलेज योजनाचा शुभारंभ करत हरियाणातील पाच गावे दत्तक घेतली होती. या गावांना आदर्श गाव म्हणून विकसीत करण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले होते. या योजनेच्या शुभारंभासाठी राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी बीरेद्र सिंह, मंत्री ओम प्रकाश धनखडसह पाच गावांचे सरपंच उपस्थित होते. तसेच राष्ट्रपतींनी या पाच गावातील नागरिकांना व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे संबोधित केले होते.

No comments:

Post a Comment