Sunday 12 March 2017

पाकिस्तानात हिंदू विवाह कायदा मंजूर

इस्लामाबाद पाकिस्तानातल्या अल्पसंख्य हिंदुंसाठी महत्त्वाचं मानलं जाणारं हिंदू विवाह कायदा विधेयक पाकिस्तानात संमत झालं. या विधेयकामुळे पाकिस्तानस्थित हिंदुंच्या विवाहाचं नियमन करणारा विशेष व्यक्तिगत कायदा अस्तित्वात येणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभागृहांनी हे विधेयक एकमताने मंजूर केलं.

सूत्रांनुसार पाकिस्तान असेम्ब्लीने सप्टेंबरमध्ये मान्य केलेल्या मसुद्यात सिनेटने दुरुस्ती समाविष्ट केली. विधेयकाचा अंतिम मसुदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला. हे नवीन विधेयक ‘शादी पराथ’ मुस्लिमांत निकाहनामा असतो त्याप्रमाणेच असणार आहे. ‘शादी पराथ’वर लग्न लावणाऱ्या पुरोहिताने स्वाक्षरी केलेली असावी आणि संबंधित सरकारी विभागात त्याची नोंदणी केलेली असावी, असा नियम करण्यात आला आहे.

या दस्तऐवजावर वर आणि वधुची वैयक्तिक माहिती लिहीण्यात येईल. या तपशीलात केंद्रीय परिषद, तहसील, गाव आणि जिल्ह्याचे नाव तसेच वर आणि वधुचे नाव, त्यांच्या वडिलांची नावं, त्यांच्या जन्मतारखा आणि जन्माची ठिकाणं असा तपशील असेल. वधु आणि वराला दस्तऐवजावर एक साक्षीदार आणि रजिस्ट्रारच्या उपस्थितीत स्वाक्षरी करावी लागेल. या कायद्यामुळे हिंदू महिलांना विवाहाचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध हाईल.

 

सामना

No comments:

Post a Comment