Sunday 12 March 2017

सुकुमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात महाऱाष्ट्रातले तीन जवान शहीद

image

छत्तीसगडमधील सुकमा जिल्हयात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शहिद झालेल्या १२ जवानांमध्ये महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. मंगेश बालपांडे( भंडारा) नंदकुमार आत्राम( चंद्रपूर) प्रेमदास मेंढे (वर्धा) अशी त्यांची नावे आहेत. हे तीनही जवान विदर्भातील असून आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहेत. तेथे लष्करी इतमानाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सुकमा जिल्ह्यातील भेज्जी गावालगत कोताचेरुच्या जंगलात शनिवारी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १२ जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. या तिघांचे पार्थिव आज सकाळी हेलिकॉप्टरने नागपूरला आणण्यात आले. तिथून ते त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. तिथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शहिदांना श्रध्दांजली वाहणार आहेत.

सामना 

No comments:

Post a Comment