Monday 13 February 2017

संरक्षण सहकार्यासंबंधी भारत-अमेरिका चर्चा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दूरध्वनी करून द्विपक्षीय संरक्षण सहकार्यामध्ये झालेली शानदार प्रगती पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. या चर्चेत भारत आणि अमेरिका दरम्यान महत्त्वाच्या द्विपक्षीय संरक्षण प्रयत्नांचा वेग कायम राखण्यावर सहमती दर्शविण्यात आली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मॅटिस यांनी गेल्या महिन्यात संरक्षणमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भारताचे संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. पेंटागॉनचे प्रसिद्धी सचिव कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी काल सांगितले की, पहिल्या चर्चेत मंत्री मॅटिस यांनी गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संरक्षण सहकार्यात झालेली शानदार प्रगती पुढे नेण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी भारत-अमेरिका संबंधांचे राजनैतिक महत्त्व आणि जागतिक शांतता तसेच सुरक्षा भक्‍कम करण्यामधील भारताच्या भूमिकेचा उल्लेख केला.

मॅटिस आणि पर्रीकर यांच्या दरम्यान काल झालेल्या चर्चेनंतर डेव्हिस यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी संरक्षण प्राधिकरण तसेच व्यापारासह महत्त्वाच्या द्विपक्षीय संरक्षण प्रयत्नांचा वेग कायम राखण्यासंबंधी वचनबद्धता दर्शविली.

No comments:

Post a Comment