Sunday 11 December 2016

२००० रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाठी आता सेवा कर नाही!

सध्या अशा ट्रान्झॅक्शनवर १५ टक्के सेवाकर द्यावा लागतो. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करा.

Credit-Card-88888 २००० रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाठी आता सेवा कर नाही!

नवी दिल्ली: डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने व्यवहार करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता यापुढे डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे २००० रुपयांपर्यतच्या व्यवहारांवर सेवा कर लागणार नाही. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुमच्यावरचा भार जरा कमी होणार आहे.

सध्या अशा ट्रान्झॅक्शनवर १५ टक्के सेवाकर द्यावा लागतो. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करा. त्यावर कोणताही सेवा कर लावला जाणार नाहीये. मात्र, २ हजारांपेक्षा जास्त रूपयांचा व्यवहार केल्यास त्यावर कर लागेल.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यासंबंधीचा प्रस्ताव संसदेत मांडतील. एटीएम आणि बँकांबाहेर लागणा-या रांगा कमी झाल्या असल्या तरी देशाला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहे. सेवा करात सवलत देण्यासाठी जून २०१२ च्या सेवाकरासंबंधीच्या अधिसूचनेत दुरुस्ती करावी लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा निर्णयाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर या महिन्याच्या ‘मन की बात’मध्ये भारताला ‘कॅशलेस सोसायटी’ बनवण्याचं आवाहन केलं होतं.

आता याचाच एक भाग म्हणून २००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर सेवाकर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी २००० रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी ओटीपीची गरज नसल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं.

By Amit Ingole | Published: December 8, 2016 1:20 PM IST Follow Email

No comments:

Post a Comment