Monday 14 November 2016

जन धन खात्यांवर सरकारची नजर

नवी दिल्ली &  जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बॅंक खात्यांत असलेल्या शून्य शिल्लकीत अचानक मोठी वाढ होऊ लागली आहे- याची सरकारने दखल घेतली असून- यावर करडी नजर सरकारी यंत्रणांनी ठेवली आहे- पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर फक्त दोन दिवसांत बॅंकिंग व्यवस्थेत सुमारे दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत-

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले] पैसा बदलून देणाऱ्या दलालांवर सरकारी यंत्रणांचे लक्ष आहे- बेहिशेबी संपत्ती घेऊन हे दलाल सोने आणि जडजवाहिरांमध्ये गुंतवणूक करीत आहेत- यावर महसूल विभाग आणि सक्त वसुली संचालनालय नजर ठेवून आहे- जन धन योजनेअंतर्गत देशात बॅंक खाती नसलेल्या नागरिकांची बॅंकांमध्ये खाती उघडण्यात आली- ही खाती बहुतांश निष्क्रिय होती- यातील शिल्लक ही शून्य होती- आता या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला आहे- अचानक जमा होऊ लागलेल्या मोठ्या रकमेची सरकारने दखल घेतली आहे- सरकारी यंत्रणा यावरल लक्ष ठेवून आहे-
बंद केलेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही-
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

ih Vh vk;

No comments:

Post a Comment