Wednesday 12 October 2016

'पाकला शांततेची नव्हे "सर्जिकल'ची भाषा समजते' - वृत्तसंस्था

नवी दिल्ली - चीनवर अवलंबून असलेल्या अकार्यक्षम पाकिस्तानला शांततेची नव्हे तर केवळ सर्जिकलची प्रक्रियाच समजते, अशा शब्दांत बलुचिस्तानमधील बलोच महिला मंचच्या अध्यक्षा आणि बलुचिस्तानच्या चळवळीतील कार्यकर्त्या नैला क्वाद्री बलोच यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

भारत भेटीवर आलेल्या नाईला वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, "शांततापूर्ण निषेधाने पाकिस्तानवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. पाकिस्तानला केवळ सर्जिकलची प्रक्रियाच समजते. कारण तेथे सत्ता करत असलेले जनरल्स (लष्कर) शांततपूर्ण गोष्टी ऐकून घेत नाहीत. त्यांचा लोकशाहीवर, लोकांच्या मतांवर आणि मानवी हक्कांवर विश्‍वास नाही.‘ तसेच ‘पाकिस्तानचे कान अद्यापही उघडलेले नाहीत. भारताच्या राजधानी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तासमोर बलुचिस्तानमधील कार्यकर्त्यांनी अलिकडेच निषेध व्यक्त केला होता. पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानमधून आपले सैन्य मागे हटवावे आणि तेथे होत असलेला हिंसाचार थांबवावा अशी मागणी केली होती‘, असेही नैला पुढे म्हणाल्या. "पाकिस्तान बलुचिस्तानसोबत कधीही युद्ध करू शकत नाही. स्थानिकांच्या संसाधनांचे शोषण करून तेथील जनरल्स (लष्कर) ऐश करत आहेत‘, असा आरोपही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment