Sunday 16 October 2016

मी हिंदू व भारताचा मोठा प्रशंसक- ट्रम्प - वृत्तसंस्था

 

न्यूजर्सी - भारत आणि अमेरिका हे महत्त्वपूर्ण राजनैतिक साथीदार असून, मी अध्यक्ष झाल्यास भारत आणि अमेरिकेतील मैत्री आणखी वृद्धिंगत होईल. मी हिंदूंचा आणि भारताचा मोठा प्रशंसक आहे, असे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने एका चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, टॉलिवूड आणि पंजाबी संगीत कार्यक्रमांची रंगारंग होती. यातून जमा होणारा 50 टक्के निधी काश्मिरी पंडितांसाठी आणि दहशतवादाने पीडित असणाऱ्या इतर देशातील नागरिकांना दिला जाणार आहे यावेळी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प यांनी भारताची जोरदार प्रशंसा केली.

ट्रम्प म्हणाले, की जर मी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी धोरणे अमेरिकेत लागू करु. मोदी हे महान व्यक्ती आहेत. भारताप्रमाणेच अमेरिकेतही अर्थव्यवस्था आणि प्रशासनात सुधारणा करणे गरजेचे आहे. मोदींमध्ये प्रचंड उर्जा असून, ते भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करत आहेत.

No comments:

Post a Comment