Saturday 13 August 2016

राष्ट्रीय स्मारकांसमोर सेल्फी काढू नका

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव 12 ते 15 ऑगस्ट या काळात राष्ट्रीय स्मारकांसमोर सेल्फी काढू नये, अशी सूचना पर्यटन मंत्रालयाने बुधवारी केली आहे. सर्व राज्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिन व "भारत पर्व‘ निमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेचे उपाययोजना म्हणून सेल्फी न काढण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. शुक्रवारपासून (ता.12) सोमवारपर्यंत हा निर्बंध लागू राहणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांत जास्त धोका असल्याने दिल्ली पोलिसांनी खबरदारी घेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाल किल्ल्याच्या परिसरातील तीन हजार 140 झाडांभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था "ड्रोन‘च्या मदतीने भेदण्याचा प्रयत्न करण्याबाबतचे दहशतवाद्यांचे संभाषण सुरक्षा संस्थांच्या हाती आल्याने पोलिसांनी दक्षता घेतली आहे.

- वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment