Saturday 13 August 2016

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग- पंतप्रधान

नवी दिल्ली- काश्मीरमध्ये अशांतता ही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे आहे. दहशतवादाशी कठोरपणे सामना करू, तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले. मोदी म्हणाले, "कायद्याच्या राज्याशी भारताची असलेली निष्ठा ही कमजोरी आहे असे विरोधी शक्तींनी समजू नये. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना सहभागी केल्याशिवाय काश्मीरचा मुद्दा सोडविला जाऊ शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरचे जे लोक दुसरीकडे राहत आहेत त्यांनाही चर्चेत सहभागी करणे आवश्यक आहे." काश्मीरच्या सद्यस्थितीवर विचार करण्यासाठी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या समारोपावेळी मोदी यांनी भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले की, संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांनुसार काश्मीर प्रश्नावर शांततापूर्वक आणि स्थायी स्वरुपाचा तोडगा काढण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेल्या मार्गावरून आम्ही जात आहोत.

No comments:

Post a Comment