Saturday 9 July 2016

इंटरनेटवर महिलांना त्रास देणे पडणार महागात - पीटीआय

नवी दिल्ली - इंटरनेटच्या माध्यमातून महिलांना धमकावणे, त्रास देणे असे प्रकार वाढीस लागले असून, ते आटोक्‍यात येण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्याकडून छळ होत असल्यास महिला या सेलकडे त्याची तक्रार दाखल करू शकतात. संबंधितावर तातडीने कारवाई होण्यासाठी त्यांना या सेलची मदत मिळणार आहे.
महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी आज ट्‌विटरच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः ट्‌विटरवर महिलांना नाहक त्रास देणे, त्यांना धमकावणे, त्यांचा छळ करणे असे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार आटोक्‍यात यावेत, यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने ट्‌विटरच्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सेलकडे एखाद्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. गरज भासल्यास याकामी सायबर क्राइमचीही मदत घेतली जाणार आहे. महिला ट्विटरवरील https:upport.twitter.com/forms/abusiveuser या लिंकद्वारेही तक्रार दाखल करू शकतात, असे ट्विटच्या प्रतिनिधींनी बैठकीदरम्यान सांगितले.

No comments:

Post a Comment