Sunday 10 April 2016

चीन हवाई दलाचा संयुक्त सराव सुरू


शांघाई - चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलांच्या संयुक्त सरावाला आज सुरवात झाल्याचे चीनच्या संरक्षण दलातर्फे सांगण्यात आले. "शाहीन-व्ही‘ असे नाव या संयुक्त युद्ध सरावाला देण्यात आले असून, त्यात चीन आणि पाकिस्तानचे हवाई दल सहभागी झाले आहे. हा युद्ध सराव 30 एप्रिलपर्यंत सुरू राहील. सर्व देश आणि प्रांतांशी सहकार्य आणि संवाद प्रस्थापित करण्याचे चीनच्या हवाई दलाचे उद्दिष्ट आहे, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. 


अमेरिकेच्या अशिया खंडातील वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि समान शत्रू असलेल्या भारताच्या विरोधात चीन आणि पाकिस्तानने परस्परांना आपले मित्र मानले आहे, त्यामुळे परस्परांच्या अतिशय जवळ आलेले हे दोन्ही देश आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहेत. त्याच दृष्टिकोनातून दोन्ही देशांच्या हवाई दलांच्या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. 

- UNI

No comments:

Post a Comment