Monday 15 June 2015

भारतीय हवाई दलाचे मिशन 2000 विमान यमुना द्रुतगती मार्गावर उतरले

लढाऊ  विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी राष्ट्रीय महामार्गांचा उपयोग करण्याबाबत भारतीय हवाई  दल विचार करत आहे.  हवाई दलाने मिशन 2000 विमानाद्वारे या क्षमतेचे दर्शन घडवले. या विमानाने मध्य भारतातील हवाई दलाच्या तळावरुन उड्डाण  केले. हवाई वाहतूक नियंत्रण, सुरक्षा सेवा, बचाव वाहने यांसारख्या सुविधा आग्रा हवाई दल स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी उभारल्या होत्या. त्यानंतर आग्रा आणि मथुराच्या जिल्हा दंडाधिकारी  आणि पोलिस अधीक्षकांशी समन्वय साधून निवडण्यात आलेल्या महामार्गावरील  पट्टयाच्या सक्रियतेसाठी आवश्यक व्यवस्थापन करण्यात आले. या विमानाने लँडिग करण्यापूर्वी शंभर मीटर उंचीवरुन खाली येन महामार्गावर लँडिगचा सराव केला. उत्तर प्रदेश सरकार यमुना द्रुतगतीमार्ग प्राधिकरण, जे.पी. इंन्फ्राटेकचे टोल अधिकारी  आणि पोलिसांच्या सक्रिय सहाय्याने हा सराव आयोजित करण्यात आला. भविष्यात महामार्गांवर अशा प्रकारचे आणखी पट्टे कार्यान्वित  करण्याची भारतीय हवाई दलाची योजना आहे.

No comments:

Post a Comment